Posts

Showing posts from November, 2021

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (५) भोंदू / तोतया डॉक्टर

धक्कादायक : मुंबईत पकडले पाचवी पास डॉक्टर, डिग्री शिवाय चालवत होते क्लिनिक अश्या मथळ्याची  बातमी ६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिध्द झाली. ती खालील लिंक वर उपल्ब्ध आहे. यातील सर्वात सक्षम डॉक्टर फक्त बारावी पास असून,  मुंबई पोलिसांनी गेल्या दहा महिन्यात १९ बनावट डॉक्टरांना अटक केली आहे असे शेवटी म्हटले आहे. https://policenama.com/mumbai-crime-branch-arrested-six-quacks-operating-as-doctors-in-the-area/ तोतया डॉक्टर सापडला, रुग्ण पळवणारे दलाल पुन्हा सक्रीय अश्या मथळ्याची बातमी महाराष्ट्र टाईम्स ने ११ जून २०२१ रोजी दिली. त्याची लिंक देत आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/shocking-fake-doctor-found-in-nagpur-hospital-latest-updates/articleshow/83413699.cms कोव्हीड काळात अनेक बनावट डॉक्टरांनी आपले हात साफ करुन घेतले. पण  ऑक्टोबर २०२१ मधे पुण्यात घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी होती . ससून मधील तोतया डॉक्टर कडून तरुणीवर बलात्कार अश्या मथळ्याची बातमी २९ तारखेच्या लोकमत या वर्तमान पत्रात आली होती जी खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://lokmat.news18.com/pune/imposter-d...

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (४) तज्ञ

Image
कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (४) तज्ञ मागील लेखात डॉक्टरांच्या नावनोंदणी बद्दलची माहिती सांगीतल्यावर काही मित्रांनी वैद्यकीय परिषदेमधे नोंदणी कशी तपासणार असा प्रश्न विचारला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन वर त्यांची पदवी आणि नोंदणी क्रमांक छापलेला असणे अपेक्षित आहे. एम. बी. बी. एस डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे केली जाते आणि त्यांच्या संकेत स्थळावर नोंदणीक्रमांक टाकून डॉक्टरांबद्दलची माहिती तपासता येते. येथे मी माझ्या नोंदणीचे चित्र दिले आहे. आयुश शाखांतील वैद्यकीय व्यावसायिकांच्या माहितीसाठी खालील संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल. https://mcimindia.org.in/Detail/FAQ पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले असल्यास विद्यापीठाकडून मिळालेली पदव्युत्तर पदवी आणि त्याची नोंद वैद्यकीय परिषदे कडे केल्याचे प्रमाणपत्रसुध्दा रुग्णालयाच्या दर्शनीभागात लावणे आवश्यक आहे. जसे वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापल्या शाखेतील उपचार करणे अपेक्षित आहे तसेच पदयुत्तर प्रशिक्षण घेतलेल्यांनीसुद्धा आपापल्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातच विशेषज्ञ म्हणून काम करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ जनरल मेडिसीन मधे एम. डी. असलेल्या डॉक्...

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (३) पात्रता

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काम करण्यासाठी काय पात्रता असायला हवी ते आता पाहू.  १. मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे. २. राज्य स्तरीय अथवा राष्त्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडे नाव नोंदवणे ३. पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले असल्यास पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे  ४. वैद्यकीय परिषदेकडे पदव्युत्तर पात्रतेची नोंदणी करणे ५. आपल्या पात्रतेच्या क्षेत्रातच तज्ञ म्हणून काम करणे. रुग्णांच्या दृष्टीने यातील शेवटचे कलम महत्वाचे आहे, परंतू त्यावरील चार कलमांकडे कोणीही लक्ष देत नाही म्हणून त्याबद्दल विस्ताराने लिहित आहे. प्रत्येकाने असा विचार करुन बघावा की आपण ज्या डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो त्यांच्या शिक्षणाबद्दल अथवा प्रशिक्षणाबद्दल आपन चौकशी करतो का? बहुतेक वेळा कोणीतरी सांगीतले म्हणून आपण एखाद्या डॉक्टर कडे जातो. तेथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांची पदवी नक्की कोणत्या शाखेची आहे हे पहायला हवे. डॉक्टरांनी त्यांच्या पदवीची प्रत तसेच वैद्यकीय परिषदेकडे केलेल्या नोंदणीचे प्रमाणपत्रसुध्दा ठळकपणे दिसेल अश्या पध्दतीने दवाखान्यान दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. याव...

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (२)

प्रथम आपण हे लक्षात घेऊ की वैद्यकीय व्यावसायिकाने स्वत: जाणीवपूर्वक निर्णय घेऊन मानवजातीला नि:स्वार्थी सेवा देण्याचा मार्ग निवडला आहे. रुग्णांचे हित ह्याच उद्देशासाठी त्याने वैद्यकीय व्यवसायात पदार्पण करताना हिपोक्रॅटिस शपथ घेतलेली असते. अर्थात प्रत्येक व्यक्तीला आपले आयुष्य जगण्यासाठी अर्थार्जन करणे क्रमप्राप्त असल्याने वैद्यकीय व्यावसायिकाने सर्व रुग्णांवर मोफत उपचार करावेत अशी अपेक्षा या हिपोक्रॅटीस शपथेत नाही हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.  वैद्यकीय व्यावसायिकाने आपला व्यवसाय योग्यप्रकारे करावा यासाठी अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. कायदा म्हणजे लोकप्रतिनिधींनी  अथवा सक्षम अधिकार्‍याने तयार केलेले व समाजावर बंधनकारक असलेले नियम ज्यांचा उद्देश जनहितार्थ असतो व त्यांचे पालन न केल्यास तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही स्वरुपात शिक्षा संभवते.  वरील विवेचनावरुन असे लक्षात येईल की वैद्यकीय व्यवसाय आणि कायदा, एका व्यक्तीच्या आणि समाजाच्या हितासाठी एकमेकांशी संलग्न आहेत. कायद्याचे पालन करण्याबरोबरच वैद्यकीय व्यवसायिकाकडून सामाजिक मूल्यांची आणि नैतिक तत्वांची अपेक्षा असल्यामुळे व...

मेडिको-लीगल क्षेत्रासंबंधी माहिती : (१)

मेडिको-लीगल क्षेत्रासंबंधी माहिती : (१) वैद्यकीय विद्यार्थ्यांना फोरेन्सिक मेडिसिन असा विषय असतो ज्याचे मराठीत भाषांतर न्यायवैद्यक शास्त्र असे केले जाते. या शास्त्रात प्रामुख्याने न्यायव्यवस्थेशी वैद्यकशास्त्राचा कसा संबंध येतो हे समाविष्ट असते.  वैद्यकीय पदवीधरांना मृत्यूचा दाखला देण्याची कायद्याने परवानगी असते. हे काम करताना रुग्णाचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला किंवा अनैसर्गिक रित्या झाला याबद्दल प्रथम निर्णय घ्यावा लागतो. अनैसर्गिक मृत्यू मधे अपघात, आत्महत्या, खून इत्यादींचा समावेश असतो त्यासाठी  शवचिकित्सा करावी लागते (पोस्टमॉर्टेम / मरणोत्तर तपासणी). मृत्यू किती वेळापूर्वी झाला, काय कारणाने झाला, तसे समजणे अवघड असेल तर शवविच्छेदन करुन अवयव विशेषज्ञांकडे पाठवून त्याच्या अहवालानुसार मृत्यूचे कारण ठरवावे लागते. हा झाला मेडिको-लीगल क्षेत्राचा एक भाग.  रुग्णांना उपचार देताना सुध्दा वैद्यकीय व्यावसायिकांना अनेक कायदेशीर बाबींची  काळजी घ्यावी लागते, अनेक कायदे पाळावे लागतात. त्यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न या मालिकेत करणार आहे. यामधे वैद्यकीय उपचारांमधील नैतिकता, सं...