कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (३) पात्रता
वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काम करण्यासाठी काय पात्रता असायला हवी ते आता पाहू.
१. मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे.
२. राज्य स्तरीय अथवा राष्त्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडे नाव नोंदवणे
३. पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले असल्यास पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे
४. वैद्यकीय परिषदेकडे पदव्युत्तर पात्रतेची नोंदणी करणे
५. आपल्या पात्रतेच्या क्षेत्रातच तज्ञ म्हणून काम करणे.
रुग्णांच्या दृष्टीने यातील शेवटचे कलम महत्वाचे आहे, परंतू त्यावरील चार कलमांकडे कोणीही लक्ष देत नाही म्हणून त्याबद्दल विस्ताराने लिहित आहे.
प्रत्येकाने असा विचार करुन बघावा की आपण ज्या डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो त्यांच्या शिक्षणाबद्दल अथवा प्रशिक्षणाबद्दल आपन चौकशी करतो का? बहुतेक वेळा कोणीतरी सांगीतले म्हणून आपण एखाद्या डॉक्टर कडे जातो. तेथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांची पदवी नक्की कोणत्या शाखेची आहे हे पहायला हवे. डॉक्टरांनी त्यांच्या पदवीची प्रत तसेच वैद्यकीय परिषदेकडे केलेल्या नोंदणीचे प्रमाणपत्रसुध्दा ठळकपणे दिसेल अश्या पध्दतीने दवाखान्यान दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. यावरुन त्यांनी कोणत्या शाखेची पदवी आहे हे समजते.
एलोपॅथी बरोबरच आयुर्वेद, योगोपचार, उनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी, (आYूSः) अश्या निरनिराळ्या वैद्यकीय शाखा असून प्रत्येकात निरनिराळे उपचार केले जातात. एका शाखेच्या वैद्यकीय व्यावसायिकाने दुसर्या शाखेचे उपचार करु नयेत असे संकेत असले तरीही सर्वच वैद्यकीय व्यावसायिक एलोपॅथीचे उपचार करताना आढळतात. त्यामुळे रुग्णाने त्याबद्द्ल जागरुक असणे आवश्यक आहे.
इतर शाखांच्या व्यावसायिकांनी एलोपॅथी औषधे देण्यावरुन खूप गदारोळ झाल्यामुळे आणि एकूणच वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या समाजाच्या गरजेच्या मानाने कमी असल्यामुळे इतर शाखांच्या व्यावसायिकांनी एलोपॅथी मधील औषधे देण्यापूर्वी अभ्यासक्रम करावा असा प्रस्ताव केंद्र सरकारने ठेवला. त्याला इंडियन मेडिकल असोसिएशन या एलोपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेने जोरदार विरोध केल्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना स्थानिक पातळीवर असे पाठ्यक्रम राबवायला सांगीतले. त्यापैकी फक्त महाराष्ट्राने असे "ब्रिज कोर्स" तयार करुन ते इच्छुकांना निरनिराळ्या वैद्यकीय महाविद्यालयांत उपलब्ध करुन दिले. त्यामुळे आयुष शाखांतील पदवीधर वैद्यकीय व्यावसायिकांकडून एलोपॅथीचे उपचार घेण्यापूर्वी त्यांनी अश्या ब्रिज कोर्स मधे प्रशिक्षण घेतल्याची खात्री रुग्णांनी करुन घेणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment