कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (५) भोंदू / तोतया डॉक्टर

धक्कादायक : मुंबईत पकडले पाचवी पास डॉक्टर, डिग्री शिवाय चालवत होते क्लिनिक अश्या मथळ्याची  बातमी ६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिध्द झाली. ती खालील लिंक वर उपल्ब्ध आहे. यातील सर्वात सक्षम डॉक्टर फक्त बारावी पास असून,  मुंबई पोलिसांनी गेल्या दहा महिन्यात १९ बनावट डॉक्टरांना अटक केली आहे असे शेवटी म्हटले आहे.

https://policenama.com/mumbai-crime-branch-arrested-six-quacks-operating-as-doctors-in-the-area/

तोतया डॉक्टर सापडला, रुग्ण पळवणारे दलाल पुन्हा सक्रीय अश्या मथळ्याची बातमी महाराष्ट्र टाईम्स ने ११ जून २०२१ रोजी दिली. त्याची लिंक देत आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/shocking-fake-doctor-found-in-nagpur-hospital-latest-updates/articleshow/83413699.cms

कोव्हीड काळात अनेक बनावट डॉक्टरांनी आपले हात साफ करुन घेतले. पण  ऑक्टोबर २०२१ मधे पुण्यात घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी होती . ससून मधील तोतया डॉक्टर कडून तरुणीवर बलात्कार अश्या मथळ्याची बातमी २९ तारखेच्या लोकमत या वर्तमान पत्रात आली होती जी खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://lokmat.news18.com/pune/imposter-doctor-from-sassoon-hospital-raped-married-woman-shoot-obscene-videos-and-blackmail-pune-rm-624358.html

आता हे तोतया / भोंदू डॉक्टर कसे रुग्णोपचार करु शकतात? बहुतेक वेळा ते कोणत्यातरी डॉक्टरांकडे कंपौंडर किंवा वॉर्डबॉय अश्या प्रकारचे काम करतात आणि औषधांबद्दलची जुजबी माहिती झाल्यावर आपले दुकान थाटतात. माझ्या माहितीत एक व्हेटर्नरी (प्राण्यांचा) डॉक्टर होता तो झोपडपट्टीत  दवाखाना चालवयचा. तक्रार करुनही त्याच्यावर कोणीही कार्यवाही करायचे नाही कारण त्याचा गोडबोल्या स्वभाव आणि हात ओले करायची तयारी. आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने अश्या डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर खटले भरायला हवेत.

खरे पाहता पुण्यासारख्या शहरात जे डॉक्टर प्रॅक्टीस करतात त्यांच्या डिग्री संबंधात खातरजमा करुन घेणे हे पुणे महानगर पलिकेच्या आरोग्यविभागाचे काम आहे. त्यांनी एक संकेतस्थळ तयार करुन सर्व डॉक्टरांना त्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी, ईमेल ही माहिती भरुन डिग्री प्रमाणपत्रे आणि विशेष प्राविण्य प्रमाणपत्रे अपलोड करायला सांगावीत. वॉर्डस्तरीय याद्या तयार करुन प्रत्येक विभागातील ज्या डॉक्टरांनी योग्य माहिती जमा केली आहे त्यांना एक सर्टिफिकेट द्यावे आणि ठराविक मुदतीत ज्यांचे अर्ज महानगरपालिकेकडे येणार नाहीत त्यांना दवाखाने बंद करायला लावावेत. भोंदू डॉक्टर पकडण्याचे अनेक मार्ग असू शकतील परंतू पण तिकडे लक्ष देण्यासाठी यांना वेळ आहे कोठे? सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की रस्त्यावर तंबू लावून येथे मूळव्याध, भंदर आणि जुनाट आजारांवर उपचार करण्यात येतील अशी पाटी लावलेल्या ठिकाणी लोक उपचार घेतात, पण महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांना ते दिसत नाहीत..!

Comments

Popular posts from this blog

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (६) :संमतीपत्र

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय (१४) : ग्राहक संरक्षण कायद्याचे फायदे आणि तोटे.

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (१०) ग्राहक संरक्षण कायद्याचे रुग्णांना होऊ शकणारे फायदे आणि तोटे