मेडिको-लीगल क्षेत्रासंबंधी माहिती : (१)

मेडिको-लीगल क्षेत्रासंबंधी माहिती : (१)

वैद्यकीय विद्यार्थ्यांना फोरेन्सिक मेडिसिन असा विषय असतो ज्याचे मराठीत भाषांतर न्यायवैद्यक शास्त्र असे केले जाते. या शास्त्रात प्रामुख्याने न्यायव्यवस्थेशी वैद्यकशास्त्राचा कसा संबंध येतो हे समाविष्ट असते. 

वैद्यकीय पदवीधरांना मृत्यूचा दाखला देण्याची कायद्याने परवानगी असते. हे काम करताना रुग्णाचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला किंवा अनैसर्गिक रित्या झाला याबद्दल प्रथम निर्णय घ्यावा लागतो. अनैसर्गिक मृत्यू मधे अपघात, आत्महत्या, खून इत्यादींचा समावेश असतो त्यासाठी  शवचिकित्सा करावी लागते (पोस्टमॉर्टेम / मरणोत्तर तपासणी). मृत्यू किती वेळापूर्वी झाला, काय कारणाने झाला, तसे समजणे अवघड असेल तर शवविच्छेदन करुन अवयव विशेषज्ञांकडे पाठवून त्याच्या अहवालानुसार मृत्यूचे कारण ठरवावे लागते. हा झाला मेडिको-लीगल क्षेत्राचा एक भाग. 

रुग्णांना उपचार देताना सुध्दा वैद्यकीय व्यावसायिकांना अनेक कायदेशीर बाबींची  काळजी घ्यावी लागते, अनेक कायदे पाळावे लागतात. त्यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न या मालिकेत करणार आहे. यामधे वैद्यकीय उपचारांमधील नैतिकता, संमतीपत्र, रुग्णाच्या आजारासंबंधीच्या वैद्यकीय नोंदी, इलेक्ट्रॉनिक नोंदी, रुग्णाचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदा, उपचारांमधील निष्काळजीपणा आणि मुलकी दायित्व,  गुन्हेगारी स्वरुपाच्या हलगर्जीपणाबद्दलचे दायित्व, पोलिसांकरवी डॉक्टरांना अटक करण्याबद्दलचे नियम, न्यायव्यवस्थेबाहेर तंटा सोडवण्यासंबधी नियम, रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी, डॉक्टरांवर होणार्‍या हिंसाचारा बद्दलचे कायदे, रुग्णांच्या उपचारांसंबंधीचा विमा, डॉक्टरांचा व्यावसायिक नुकसानभरपाईविमा आणि आरोग्यक्षेत्राशी निगडित अनेक कायदे उदा. पी सी पी एन डि टी (सोनोग्राफीने गर्भलिंग तपासणी) एम.टी पी (वैद्यकीय गर्भपात) मानसोपचाराची गरज असणार्‍या रुग्णांविषयी कायदा, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींविषयी कायदा, रुग्णहित संरक्षण  तसेच वैद्यकीय पेशाशी संलग्न शाखा  आणि वैद्यकीय माहिती तंत्रज्ञानाविषयक कायद्यांची माहिती देऊन प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

ही दीपावली आपणा सर्वांना आनंदाची आणि भरभराटीची जावो ही शुभेच्छा..!!

डॉ. राजीव ज़ोशी.


Comments

Popular posts from this blog

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (६) :संमतीपत्र

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय (१४) : ग्राहक संरक्षण कायद्याचे फायदे आणि तोटे.

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (१०) ग्राहक संरक्षण कायद्याचे रुग्णांना होऊ शकणारे फायदे आणि तोटे