कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय :(१५) मेडीकल ट्रायब्युनल
मागील पाच सहा लेखांमधे आपण ग्राहकांच्या फायद्यापेक्षा तोटा जास्त होत असल्याचे पाहिले. एखाद्या ग्राहकाला नुकसान भरपाई मिळताना लाख ग्राहकांच्या अनाश्यक तपासण्या, डॉक्टरांकडून मिळणार्या सहानुभूतीचा अभाव, बचावात्मक धोरणामुळे विनाकारण मोठ्या रुग्णालयात दाखल करणे आणि अवाच्या सवा बिले भरणे इत्यादी गोष्टींची कारणमिमांसा केली. तसेच त्यावर उपाय म्हणजे वैद्यकीय लवाद किंवा मेडिकल ट्रायब्युनल ची स्थापना करणे असा आहे. हे सर्व फेसबुकवर लिहिण्यापुरते नसून अश्या प्रकारचा लवाद असावा असे मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेमधे प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल केले आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारने यावर योग्य पातळीवर विचार करुन योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा असे सांगीतले आहे. त्याबद्दलची माहिती पुढे देत आहे. करोना महामारीमधे सरकारने व्यवस्थापन नीट करावे अश्या मागण्यांची ही जनहितयाचिका मुंबई ऊच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली. डॉक्टर रुग्णांना योग्य उपचार देत नाहीत, पैसे लुबाडतात अश्या अर्थाची चर्चा या जनहित याचिकेत चालू होती. १० रुपयांच्या डेक्सॉमिथॅसॉन ऐवजी ४००० रुप...