कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय (११) : ग्राहक संरक्षण कायद्याचे फायदे आणि तोटे.
१९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा आला त्यापूर्वी वैद्यकीय व्यवसायिकांविरुध्द दिवाणी अथवा गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल होत होते. नव्या कायद्यामुळे खटले दाखल करणे सोपे झाले आणि अनेक डॉक्टरांवर खटले दाखल झाले. आय एम. ए ने त्याविरुध्द न्यायालयात दाद मागितली. श्री हरीश साळवे आणि श्री सिंगवी यांच्यासारख्या मातब्बर वकीलांनी न्यायालयाला सांगीतले की रुग्ण हे ग्राहक नाहीत, डॉक्टरांनी केलेले निदान व उपचार हे कायद्याप्रमाणे "सेवा" ठरत नाहीत आणि झटपट निकाल देऊन ग्राहकांना नुकसानभरपाई देणे हे डॉक्टरांवर अन्यायकारक असून यामुळे डॉक्टर-पेशंट नात्यावर वाईट परिणाम होतील. विश्वासाच्या नात्याचे रुपांतर व्यावसायिक नात्यात होईल. वैद्यकीय उपचारांची किंमत वाढेल, डॉक्टर रुग्णाच्या उपचारादरम्यान कोणतीही जोखीम घेणार नाहीत आणि बचावात्मक पवित्रा घेऊन केलेल्या उपचारांमुळे रुग्णाचा फायदा होण्या ऐवजी नुकसानच जास्त होईल. रुग्णांच्या हक्कासाठी काही तरी केले पाहिजे अश्या जागतिक वातावरणाच्या काळात हा कायदा रुग्णहितासाठी आहे असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने, मद्रासच्या हायकोर्टाचा डॉक्टरांच्या बाजून दिलेला निकाल फि...