कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (७) केस पेपर :
मुन्नाभाई एम. बी. बी. एस. या चित्रपटात जेंव्हा अत्यवस्थ रुग्णाला आणले जाते त्यावेळी मह्त्वाचा विषय पुढे आला; आधी ट्रीटमेंट का आधी केस पेपर? आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णाला आधी उपचार दिले जात असले तरीही किमान एका कोर्या कागदावर रुग्णाची माहिती लिहिली जाते. अत्यवस्थ नसल्यास मात्र कोणत्याही दवाखान्यात अथवा रुग्णालयात गेल्यावर पहिल्यांदा केस पेपर करायला लागतो. का करायला लागतो केस पेपर? मॅक्जिबॉनी च्या व्याख्येनुसार केस पेपर म्हणजे म्हणजे रुग्णाबद्दलचा वैद्यकीय, शास्त्रीय, प्रशासकीय आणि कायदेशीर दस्तावेज असून त्यामधे "रोगनिदान आणि उपचाराचे समर्थन करणारी पुरेशी माहिती" आणि रुग्णाबद्दलच्या घटना क्रमाने नोंदवलेल्या असतात. याचाच अर्थ असा की डॉक्टरांनी कोणत्या रुग्णावर कोणते उपचार का केले याची क्रमवार माहिती केस पेपरवर नोंदवणे अपेक्षित आहे. अतिदक्षता विभागात आलेल्या अत्यवस्थ रुग्णावर उपचार दिल्यानंतर का होईना डॉक्टरांनी केसपेपरवर नोंदी करणे कायद्याने बंधनकारक आहे. पुढ्च्या वेळी रुग्ण उपचारांसाठी दवाख्यान्यात अथवा रुग्णालयात आल्यास केस पेपर वरुन पूर्वी काय आजार होता, काय उपचार केले...