कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (८) प्रिस्क्रिप्शन
"ईश्वर चरणी विलीन होईपर्यंत ही औषधे घ्यावीत" असे माझ्या मावसभावाच्या प्रिस्क्रिप्शनवर त्याच्या डॉक्टरांनी लिहिले होते. घाबरून जाऊन त्याने मला फोन केला की माझा आजार इतका सिरियस आहे का? मी त्याला सांगीतले की याचा अर्थ आयुष्यभर औषधे चालू ठेवायची आहेत. (अर्थात औषधे बंद केल्यास ईश्वरचरणी विलीन होण्याच दिवस लवकर येईल, पण तसे मी त्याला सांगीतले नाही..!!) आता वळूया प्रिस्क्रिप्शन कडे..!! सुवाच्य अक्षरात लिहिलेले एक प्रिस्क्रिप्शन घेऊन माणूस केमिस्टकडे जातो. त्याला काय लिहिले आहे ते कळत नाही. केमिस्ट त्याला शेजारील डॉक्टरांकडे पाठवतो व त्यांच्याकडून लिहून आणा असे सांगतो. डॉक्टर ते वाचून एका कागदावर त्याच्या हस्ताक्षारात लिहून देतो. ते त्या माणसाला वाचता येत नाही पण केमिस्ट औषधे काढून देतो अशी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. विनोदाचा भाग सोडल्यास ही वस्तुस्थिती आहे की ६५% रुग्णांना डॉक्टरांनी काय लिहिले आहे ते कळत नाही. ४७% रुग्णांना डोस कसा घ्यायचा ते कळत नाही असे एका अभ्यासात आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या फूड एन्ड ड्र्ग एथॉरिटीने प्रिस्क्रिपशन कसे असावे याबद्दल एक नि...